Wednesday, March 2, 2011

माझ्या प्रत्येक शब्दात


माझ्या प्रत्येक शब्दात लपलेला संदर्भ 

मलाच उलट डीवचन सोडत नाही 

कोणी उलगडून विचारतही नाही 

कोणाला स्पष्ट सांगावासही वाटत नाही


तनवीर

चुकूनही अवेळी


चुकूनही अवेळी तिचे 'प्रेम' ऊतू जावू नये

म्हणून मी खूप काळजी घ्यायचो 

एक दिवस पहिले आणि एक दिवस नंतरही

प्रत्येक रक्षाबंधनाला शाळा कॉलेज बुडवायचो


तनवीर

ती ज्या रस्त्याने जायची


ती ज्या रस्त्याने जायची मी पहिलेच हजर असायचो 

लिहून दगडावर आमचे प्रेम- आणि दगडामागेच लपायचो 

कधीतरी वाचेल ती या आशेत जगले आजवर 'तिन्ही'

तिचे नाव, माझे नाव - दगडावरचे आणि 'दगड' मी


तनवीर

मरणाअगोदर एकदा मला


मरणाअगोदर एकदा मला 

ताजमहाल पाहायचा आहे

तो प्रेमासाठी 'बांधून' गेला 

आम्हाला चित्रातही जमले नाही


तनवीर

'हाजीअलीच्या' भेटीत


'हाजीअलीच्या' भेटीत उदारता व्याकूळ झाली 

गरिबांना मदत कर -'भावना' धावून आली 

'पहिल्या' कडूनच शंभरची नोट- नव्वद चिल्लर घेतली 

माग तिच दुसऱ्यापासून मोजत मोजत वाटली


तनवीर

रस्त्यावरच आपला


रस्त्यावरच आपला हात 'पोपट' नाथ 

रोजच 'छान भविष्य; असे सांगतो

त्याला हाथ नाहीत ना!! भविष्य त्याचे?

माग माझ्याकडेच पाच रुपये मागतो


तनवीर

जाताना फक्त सांगून जा


जाताना फक्त सांगून जा की मी का जगावं?

विझावलेल्या स्वप्नांना परत का गोंजाराव?

तू असताना तुझ्यासाठीच हसत राहिलो 

आता का जगून स्वत:वर हसत रहाव?



तनवीर

तारुण्य भाड्यावर


तारुण्य भाड्यावर भेटत असेल 

तर मी पण पैसे मोजायला तयार आहे 

बहुतेक जळून 'खपले' तुझी वाट पाहत

उरलेले लवकरच 'पिण्यात' संपणार आहे


तनवीर

भ्रष्टाचारावर लिहाव


भ्रष्टाचारावर लिहाव अस ठरवतोय

पण पूर्ण जन्म लहान पडेल असे वाटतय

कश्याला ओरबाडयाच्या छोट्मोठ्ठ्या 'उलाढाली'

हा 'देश' च कोठेतरी 'गहाण' असेल असे वाटतंय


तनवीर

काल रस्त्यावर पाहिले


काल रस्त्यावर पाहिले 

'एकजण' केल्याची साल टाकून गेला

बाजूलाच एक कुत्रा 'घाण' करत होता 

तो मात्र जाताना माती उकरून टाकून गेला


तनवीर

आपण किती दु:ख भोगले


आपण किती दु:ख भोगले याला अर्थ नसतो 

किती खंबीरपणे जगलो हेच मोजले जाईल 

आपले अश्रू वेचायलाच बाकीच्यांचा जन्म नाही 

अंतत: आपले कर्तृत्वच पडताळले जाईल


तनवीर

जीवनातला प्रत्येक क्षण


जीवनातला प्रत्येक क्षण

आनंदाने जगायला शीक

तुझी भविष्य लेखणी आहे तुझ्याच हाती 

तू फक्त तिच्याने नीट लिहायला शीक


तनवीर

शाळेत जायचं नाही..


शाळेत जायचं नाही म्हणून रोज 'पाऊस पड' म्हणायचो

पेरलेले हसून जाईल 'पाऊस थांब' बाप रोज रडायचो !!

अर्ध सुनामीने वाहून नेले

अर्ध दुष्काळ खावून गेले

या चक्रात माझाही शाळेत जाणं 'राहून' गेले




तनवीर

एका चुकीचा राग..


एका चुकीचा राग नको पूर्ण श्वासांवर 

वीज पुन्हा त्याच जागी पडत नाही 

खंबीर हो-चालत रहा-पाषाण जसा 

जो रडतही नाही - रडला तर दिसूनही येत नाही


तनवीर

मला फक्त..


मला फक्त पाण्यासारखे बनायचे आहे

'आपल्यांच्या' विभिन्न भावनेत मिसळायचे आहे

आयुष्य माझ 'चिखल' - मला मंजूर आहे

पण माझ्या प्रत्येकाला कमळ बनवायचं आहे


तनवीर

लिहिलंच पाहिजे म्हणून..


लिहिलंच पाहिजे म्हणून मी लिहित नाही 

लिहिलेलं चांगल व्हाव यासाठीही झटत नाही 

मग ते कोणी वाचावच ही सुद्धा व्यथा नाही 

ही फक्त नियतीने केलेल्या 'मुकेपणाची' गाथा आहे


तनवीर

का परत आठवावं..


का परत आठवावं मी तुझ प्रेम?

अन झटाव गोठलेल्या हृदयाला जागवायला 

फक्त तुझ्या डोळ्यांच्या शाईने लिहिलेला 

एकतर्फी संमतीचा कबुलनामा फाडायला?


तनवीर

Tuesday, March 1, 2011

जर चोरायचच असेल तर ..



जर चोरायचच असेल तर 

हिरे माणके 'खरे' पडतात 

कुणासाठी चंद्र तारे आणून 

रडण्यापेक्षा बरे पडतात


तनवीर