Wednesday, July 27, 2011

काहीतरी सांग तरी

काहीतरी सांग तरी 

नक्की काय होईल ते..

प्रेम म्हणजे कसे होईल

मला कसे कळेल ते ?

तनवीर

प्रेम म्हणजे नक्की काय?

मग प्रेम म्हणजे नक्की काय?

आनंद दु:ख की वेगळच काय..

अजूनही मी अजानच आहे 

समजवा की खरा मुद्दा काय ..?

तनवीर

मी तर तेच बुचकळ्यात आहे

मी तर तेच बुचकळ्यात आहे 

प्रेमाची व्याख्या समजत नाहीये 

आनंद भेटतो? म्हणजे काय?

छोट छोटे अर्थ उमगत नाहीये..


तनवीर

प्रेम म्हणजे असत काय?

प्रेम?.प्रेम म्हणजे असत काय?

हसण,रडण याशी संबंध काय?

त्याच्या असण्याचा फरक पडतो?

नाही नसल्याने बिघडत काय?


तनवीर

काय काय होत उमगत नाही

काय काय होत उमगत नाही 

'ते' हसण रडण विरत नाही 

स्वप्न छळतात मी हरतेय अशी 

काय गमावतेय कळत नाही


तनवीर

Wednesday, July 20, 2011

तुझ्याकडून गडे फक्त

तुझ्याकडून गडे फक्त

जखमाच तुझ्या मागत आहे

तूच स्वत:स एकट समजून

स्वत:पुढेच पळत आहेस..


तनवीर

मला सुख समजून बघशील तर

मला सुख समजून बघशील तर 

आयुष्य गोठत जाईल सांभाळ
 
मला दु:ख समजून जरा बघ

'वर्तमान' सोप्प वाटेल सुकाळ


तनवीर

काही गोष्टी खर बोलाव तर

काही गोष्टी खर बोलाव तर 

मनाला आधीच हव्या कळायला 

कोणी 'श्वास' होत मग 'त्रास' होत 

शब्दच उरतात स्वत:ला समजवायला


तनवीर

शब्द कितीही चांगले तरी

शब्द कितीही चांगले तरी 

आपल्यागत 'अनाथ' असतात 

आपणच ठरवतो 'आपल' कोण 

न क्षणात बाकीचे 'परके' होतात


नाही?


तनवीर

तेच म्हणतो लक्षात ठेव


तेच म्हणतो लक्षात ठेव
 
येईल ते क्षण जगत जा 

कधी लागलच थोडस हसू 

क्षणभर हेच प्राक्तन बघत जा


तनवीर

प्रेम कराव मनातच ठेवाव

प्रेम कराव मनातच ठेवाव 

मागण्या मात्र ठेवू नयेत

प्रत्येक श्वासावर कोणाच्या 

स्वत:चेच नाव ठेचू नयेत


तनवीर

दिशा ठरवण्याच प्रत्येकाच


दिशा ठरवण्याच प्रत्येकाच

आपापल वेगळ प्रमेय असत 

सर्वांचा मागणे सुखच असते 

तरी प्रेम हे एकमेव ध्येय नसत


तनवीर
प्रेम करणं मग एकट्यात रडण

हेच 'जगण' या गोष्टीच खोटी आहेत 

आयुष्याचा एक भाग तो, असावाच 

माझी स्वप्ने अजून मोठी आहेत


तनवीर

Tuesday, July 19, 2011

प्रेमात असशील तर खचू नकोस 

स्वप्न-सत्य व्याख्या बघू नकोस 

अर्थ त्यालाच ज्यात खुश 'आपण'

अस अबोल जगण जगू नकोस


तनवीर

स्वत:च्या रडू सांगण्याएवढ

स्वत:च्या रडू सांगण्याएवढ

फक्त हसू-स्वार्थी राहू नकोस..

मलाही विचारत जा ग गडे 

दोन्ही 'हसुंचा' अंत पाहू नकोस..


तनवीर

थोडे इकडे तिकडे शोध कोपरे
 
एक 'वेडा' अजून थांबून आहे..!!

अश्रू पुसून हल्क हसलीस न?

लपून ओशाळत वाकून पाहे..


तनवीर

मीच सांगितलं पाहिजे सर्व


मीच सांगितलं पाहिजे सर्व

असा कुठे नियम आहे?

माझ्या हृदयास पण आस आहे 

की त्यावर कोणाच प्रेम आहे?


तनवीर

विसरण एवढ सोप्प असत

विसरण एवढ सोप्प असत

तर फार बर झाल असते

तुला जमेल का बघ आधी?

मग मलाही करता आल असत



तनवीर

काय होतंय तुला?

अग काय काय होतंय तुला?

हा प्रेमाचाच भास नाही का?

जो विश्व तुझ बनून जात अजाण

त्याला न सांगण त्रास नाही का?


तनवीर

तुला अस का ग झाल?


मी पुढचे श्वास साठवत होतो

डोळ्यात तुला भरून

तुला अस का ग झाल?

मला वळताना बघून ?


तनवीर



प्रेमाला वाहू दे


प्रेमाला वाहू दे ग झऱ्यासारख

तरच दोन्ही 'शेत' हिरवळतील 
  
असंच साठून राहील तर 

आठवांचे तण पण कोमजतील


तनवीर

'उत्तर' शोध

वाटा मध्येच 'उत्तर' शोध

नाहीतर 'वाटा' दुरावत जातील

मन मग 'मला' शोधत राहील

आणि हे खूळ टोचत राहतील


तनवीर