चारोळ्या आणि मी
Wednesday, July 27, 2011
काहीतरी सांग तरी
काहीतरी सांग तरी
नक्की काय होईल ते..
प्रेम म्हणजे कसे होईल
मला कसे कळेल ते ?
तनवीर
प्रेम म्हणजे नक्की काय?
मग प्रेम म्हणजे नक्की काय?
आनंद दु:ख की वेगळच काय..
अजूनही मी अजानच आहे
समजवा की खरा मुद्दा काय ..?
तनवीर
मी तर तेच बुचकळ्यात आहे
मी तर तेच बुचकळ्यात आहे
प्रेमाची व्याख्या समजत नाहीये
आनंद भेटतो? म्हणजे काय?
छोट छोटे अर्थ उमगत नाहीये..
तनवीर
प्रेम म्हणजे असत काय?
प्रेम?.प्रेम म्हणजे असत काय?
हसण,रडण याशी संबंध काय?
त्याच्या असण्याचा फरक पडतो?
नाही नसल्याने बिघडत काय?
तनवीर
काय काय होत उमगत नाही
काय काय होत उमगत नाही
'ते' हसण रडण विरत नाही
स्वप्न छळतात मी हरतेय अशी
काय गमावतेय कळत नाही
तनवीर
Wednesday, July 20, 2011
तुझ्याकडून गडे फक्त
तुझ्याकडून गडे फक्त
जखमाच तुझ्या मागत आहे
तूच स्वत:स एकट समजून
स्वत:पुढेच पळत आहेस..
तनवीर
मला सुख समजून बघशील तर
मला सुख समजून बघशील तर
आयुष्य गोठत जाईल सांभाळ
मला दु:ख समजून जरा बघ
'वर्तमान' सोप्प वाटेल सुकाळ
तनवीर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)