Tuesday, July 19, 2011

प्रेमाला वाहू दे


प्रेमाला वाहू दे ग झऱ्यासारख

तरच दोन्ही 'शेत' हिरवळतील 
  
असंच साठून राहील तर 

आठवांचे तण पण कोमजतील


तनवीर

'उत्तर' शोध

वाटा मध्येच 'उत्तर' शोध

नाहीतर 'वाटा' दुरावत जातील

मन मग 'मला' शोधत राहील

आणि हे खूळ टोचत राहतील


तनवीर

Monday, May 30, 2011


काळीज चिरणारा तिचा वेध 

सावळसर पापण्यांनी रोखलेला

पाळीव बंडखोर बटांनी मुद्दामच 

गालावरच्या खळीचा खड्डा झाकलेला


तनवीर

Monday, April 25, 2011

तू खूप छान आहेस


तू खूप छान आहेस आज इतकंच कौतुक पुरे

अतिविश्वास ध्येयाचा नेम चुकवू शकतो 

मग गर्व येतो लपून आलेल्या तणासारखा 

जो यशच्या वृक्षाचे दोन थेंब पाणीही हुकवू शकतो


तनवीर

कसं सांगू


कसं सांगू तुझ महत्व माझ्या आयुष्यात 

मिठाची तर भातुकलीतही परीक्षा होत नाही 

जीव माझा- देह माझा - श्वास ओढतो कसातरी 

पण तू आत्मा असल्याने कधी त्रास मात्र होत नाही


तनवीर

तू खूप खास


तू खूप खास आहेस माझ्यासाठी 

जुळवलेली अबोल स्वप्न तोडू नकोस 

नाती जुळत असतात कुठेतरी आभाळात 

तू दैवाच्या त्या विणलेल्या रेघा खोडू नकोस


तनवीर

Sunday, April 24, 2011

कोणी प्रेम करणे


कोणी प्रेम करणे तुझ्याकडून शिकावं 

कुणा अश्रू दिसला तर पावसात भिजले म्हणावं 

एकांतातही बोलक्या गोड अपेक्षेत जगावं 

शुद्धीवर आलो की पुन्हा 'ये रे पावसा' म्हणावं



तनवीर